मराठी लेख.......भाग 1...दी१२/०७/१८
😊काही भाव असे पण आसतात ते न बोलून सांगता येते ना लिहून ..पण खरच कोणती तरी वेळ अशी पण असते की न सांगता पण काही जण ओळखून घेतात ,त्या साठी ती व्यक्ती खूप मनापासून खास असली पाहिजे ... भविष्यात जे म्हणाल ती करण्याची धमक आपल्यात असते त्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही पण कमतरता असते ती आपल्यात आसेला भोलेपणा आणि दुसऱ्याकडून होते असलेला खलगर्गीपना ...म्हणूनच तुम्ही काय आहात हे नका दाखवू ,पुडची व्यक्ती तुमच्या साठी
काय आहे हे लक्षात घेऊन त्या व्यक्ती साठी मनातून जेवढं होईल तेवढं करा ,आणि ती व्यक्ती पण तुमच्या साठी आणि तुम्ही पण त्या व्यक्ती साठी विशेष असणं गरजेचं हे....
"खरच समाजात कोण कोणासाठी काय आहे हे महत्वाचं नाही तर कोण कोणासाठी काय करतो हे महत्वाचं आहे"...वेळ बदलते काळ बदलतो पण माणूस तेव्हाच बदलतो जेव्हा सर्व्ह जण त्या व्यक्ती साठी बदलेले असतात...
#. विषय समाधानी असण्याचा ........
मला माझा मार्गदर्शन सरांनी विचारलं होत की तू तुझ्या जिवनात समाधानी आहेस का ?...
1 मिनिट विचार केला आणि सांगितलं की माणूस हा कधीच समाधानी नसतो ,जस जसे त्याच्या गरजा पूर्ण होतात तस तसे त्याची गरज वडायला लागते .आणि जी परिस्थिती आहे अथवा जी काही गरज आपली पूर्ण झाली त्या गोष्टीत तो कधीच समाधानी नसतो...
कमीत कमी 22 व्या वयापर्यंत शिक्षण घ्यायचं आणि सेवठी 2 ते 3 वर्ष नोकरी साठी तारांबळ करून घ्यायची ,कमी पगारात आणि जास्तीच्या वेळ कामात स्वताला व्यथित करून टाकायचं हेच सद्याची जगण्याची पद्धत आपली ठरली ,जवळ पास 26 ते 27 वर्ष ह्यात घालायचं आणि जे काही पगार मिळतो त्या पगारात स्वतःला adjesment करायचं आणि कस बस मन मारून कोणाच्या तरी मनाला सावरून स्वतःच आयुष जगायचं...
आपल जे काही स्वप्नं आहे ते स्वप्न पूर्ण करायचं म्हणल तर मग जवळ पास 50 वी पार करावी लागेल...
हा जो सगळा खेळ आहे तो फक्त वेळेचा आहे,जो कोणी ह्या वेळे सोबत चालेले तोच आपल्या जीवनाचा अर्थ लावू शकतो.. आपले जे काही स्वप्न आहे ते आपण ह्या परिस्थितीत 30 वर्ष ह्यात तर पूर्न्ह नाही करू शकत .
स्वतःच घर , गाढी आणि स्वतःची बचत आपण कमी पगारात नाही पूर्ण करू शकत ..
आताची परिस्थिती खूप गंभीर आहे .आणि वेगळी , ह्या परिस्थितीत पाण्यासाठी सुधा पैसे मोजावे लागतात .....,
31 व्या वर्षानंतर लग्न गठित बधल्या जतोत आणि जे काही स्वप्न आपण लहान पणी बगितल त्या स्वप्नाला आपण आर्ध्यातच पूर्णविराम लावून मोकळे होतो ...मग 10 ते 15 वर्ष परिवार सांभाळण्यात जाते ,आणि राहील जे काही मूठ भर आयुष्य ते मुल सांभाळण्यात आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यात जाते ,पण मला सांगा आपण केव्हा तरी समाधानी होतो का....!आपण आपलं स्वप्न पूर्ण करू नाही शकत ,तर आपण स्वतःला कधीच समाधानी नाही म्हणू शकत.......