............................. आठवणीतले मित्र , आठवणीतच ............................
प्रिय मित्रा तसेच भावा ,
तूझ्या मनात माझी जागा कितपत आहे हे नाही माहीत ,पण तुम्ही माझे मित्र नसून भाऊच आहोत..
नशीबाच्या उलघट्या नात्यात तुला वाटते मी विसरून गेलो असेल , पण भावा हे सरासर खोटं आहे .आज जरी मी तुमच्या पासून खूप दूर गेलो असेल ,पण आजही तुमची आणि तुमच्या मैत्रीची जागा कोणी प्रस्तावित नाही करू शकली.कस सांगू तुला भावा,की भविष्याच भविष घडवण्यासाठी मी तुझा पासून लांब गेलो.खरच आज पण माझे डोळे पाण्याच्या थेंबाने पाणावतात.आज मी जरी मोठा झालो असेल , सोबत जोडीदार पण असेल आणि स्वतःची एक ओळख पण असेल ,पण मित्रा तुझ्या शिवाय ह्या साऱ्या गोष्टी फिक्या आहेत .आज जर मी संकटात असेल न सगळ्यात आधी मला तुझी आठवण येते आणि लगेच तुला फोन नकळत केला जातो...काहीही असो पण मित्रा ह्या संसाराच्या जाळ्यात खरच आपण खूप दूर गेलो.. पण तितकेच मनाने जवळ झालो.. काही मित्र असे झाले त्यांचा फोन आणि मेसेज फकत्त जन्मदिवसनिमित्त येतो ..
मित्रा, तुला जर मी विसरलो वाटेल तर माफ कर ,पण काय करू मित्रा आई वडिलांनी जे स्वतःसाठी लहान पणी स्वप्न पाहिलं ,पण वेळ अभावी पूर्ण नाही करू शकले ,ते त्यांचं स्वप्न .पूर्ण करण्याचं स्वप्न मी माझ्या हाती घेऊन ,ते माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे...कधी भेट जरी नाही होऊ शकली तरी मित्रा शेवटी तरी भेटायला ये ..कमीत कमी तूझ्या एक खांधा जरी मिळालं तरी मला खूप झालं....पण भावा येवढ्या लवकर नाही सोडून जाणार .प्रत्येक क्षण मन हेलावून जाते रे..आयुष्य लहान आहे अस वाटत पण भावा जो क्षण तुमच्या मैत्रीत घालवला न तो क्षण खूप मोठा वाटतो..
खूप मनात जीवनाबद्दल खंत आहे . स्वतःला घडवण्यासाठी आणि संकटाशी लढण्यासाठी आपण खूप मोठ्या गोष्टी आणि नाती गोती मागे सोडून गेलो....
No comments:
Post a Comment