Sunday, March 28, 2021

खूप मनात जीवनाबद्दल खंत आहे . स्वतःला घडवण्यासाठी आणि संकटाशी लढण्यासाठी आपण खूप मोठ्या गोष्टी आणि नाती गोती मागे सोडून गेलो...

 .............................  आठवणीतले मित्र , आठवणीतच ............................


प्रिय मित्रा तसेच भावा ,
          तूझ्या मनात माझी जागा कितपत आहे हे नाही माहीत ,पण तुम्ही माझे मित्र नसून  भाऊच आहोत..
नशीबाच्या उलघट्या नात्यात तुला वाटते मी विसरून गेलो असेल , पण भावा हे सरासर खोटं आहे .आज जरी मी तुमच्या पासून खूप दूर गेलो असेल ,पण आजही तुमची आणि तुमच्या मैत्रीची जागा कोणी प्रस्तावित नाही करू शकली.कस सांगू तुला भावा,की भविष्याच भविष घडवण्यासाठी मी तुझा पासून लांब गेलो.खरच आज पण माझे डोळे पाण्याच्या थेंबाने पाणावतात.आज मी जरी मोठा झालो असेल , सोबत जोडीदार पण असेल आणि स्वतःची एक ओळख पण असेल ,पण मित्रा तुझ्या शिवाय ह्या साऱ्या गोष्टी फिक्या आहेत .आज जर मी संकटात असेल न सगळ्यात आधी मला तुझी आठवण येते आणि लगेच तुला फोन नकळत केला जातो...काहीही असो पण मित्रा ह्या संसाराच्या जाळ्यात खरच आपण खूप दूर गेलो.. पण तितकेच मनाने जवळ झालो.. काही मित्र असे झाले त्यांचा फोन आणि मेसेज फकत्त जन्मदिवसनिमित्त येतो ..
मित्रा, तुला जर मी विसरलो वाटेल तर माफ कर ,पण काय करू मित्रा आई  वडिलांनी जे स्वतःसाठी लहान पणी स्वप्न  पाहिलं ,पण वेळ  अभावी पूर्ण नाही करू शकले ,ते त्यांचं स्वप्न .पूर्ण करण्याचं स्वप्न मी माझ्या हाती घेऊन ,ते माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे...कधी भेट जरी नाही होऊ शकली तरी मित्रा शेवटी तरी भेटायला ये ..कमीत कमी तूझ्या एक खांधा जरी मिळालं तरी मला खूप झालं....पण भावा येवढ्या लवकर नाही सोडून जाणार .प्रत्येक क्षण मन हेलावून जाते रे..आयुष्य लहान आहे अस वाटत पण भावा जो क्षण तुमच्या मैत्रीत घालवला न तो क्षण खूप मोठा वाटतो..
खूप मनात जीवनाबद्दल खंत आहे . स्वतःला घडवण्यासाठी आणि संकटाशी लढण्यासाठी आपण खूप मोठ्या गोष्टी आणि नाती गोती मागे सोडून गेलो....

Friday, August 23, 2019

मी कोण आहे.🤔?..

मी कोण आहे.🤔?.....
स्वतःची ओळख आपण आपल्या नाव किर्तीतून उकल करतो ,पण नेमकं आपण,कधी आपल्या मनाला विचारुन स्वतःची ओळख समोरच्या माणसाला नाही देली.....
मी कोण आहे ? हा जो प्रश्न आहे ,तो माझा करता समित नाही ,तो माझा मधल्या अस्थरित माणसाची ओळख करून देण्या इतपत समीत आहे....
आणि जेव्हा केव्हा मी माझा नावाव्यक्तरीत  स्वतःची,अनोळखी व्यक्तीशी ओळख स्वतःच्या मनाला विचारुन सांगेल तेव्हा ती माझी खरी ओळख असेल....
स्वतःची ओळख प्रत्येक स्टेज ला नीप्ररांगत असते,जस ,की नोकरीच्या क्षेत्रात स्वतचं पेशा सांगतो ,हॉस्पिटल मधे स्वतःची ओळख पेशंट म्हणून सांगतो आणि शिक्षण क्षेत्रात आपण विद्यार्थी  शी स्वतः चा अनुवाद करतो , पण जेव्हा आपण कोणत्या पण स्टेज पर्यंत नसतो तेव्हा आपण आपल नाव सांगून मोकळे होतो.
जो हा वेळ असतो ,जे की आपली ओळख सांगण्यासाठी समोरच्याला आपल नाव सांगावं लागते तेव्हा स्वतः समजून जायचं की आजुन आपल्याला आपली ओळख बनवायची आहे. आपलं त्या स्टेज पर्यंत काहीच मिळवलेल नसते ,हे नाव पण कोणीतरी देऊन गेलेलं असते...हेच कळायला आपल्याला खूप वेळ लागतो..
स्वातला गरीब अथवा धनवान म्हणून काही अर्थ नाही ..खिश्यात एक कण नसतो त्या क्षणात रोड वरती आपली खळगी भरवून घेणारी व्यक्ती चेहऱ्यावर स्मित ठेऊन आयुष्याशी झंडत असतो , तो स्मित हास्यच त्याला कधी गरिबीची जाणीव नाही होऊ देत ,मग आपण का गरीब आणि श्रीमंतिचा अर्थ अधनित आणि धनवान स्वरूपात मांडायची  ..जो दुःखी तो गरीब आणि जो सुखी तोच श्रीमंत आहे..
सुखी माणूस स्वतःला कोणत्याच परिस्थितीत कमी लेखत नाही ,नी दुःखी माणूस स्वतः कडे सर्व काही असतानाही नसल्यागत मन पेलवून लावतो .... 

Monday, August 19, 2019

निसर्ग निवर्ती


   ........निसर्ग निवर्ती.......
सरली माया निसर्गाची ,ती सर्वूनीच गेली,
स्वतःच्या जीवनाची,ती कमाई झाली..
खेळ हा मांडला रे, जगणाचा आम्ही,
कोपतो जेव्हा निसर्ग ,बोंबलतो दोन्ही तोंडी..
माणसाला आता वाडला,मानसातच प्रेम,
विसरलो का रे आपण, निसर्गाची ठेव...
ना जान कुणाची,ना ती जान रे मनाची ,
ना स्वतः लाच काळजी रे स्वतःची..
कधी माणूस रे हा, निसर्ग जपणार,
थांबूनी तोड निसर्गाची त्यात निवास करणार..
माया होती त्यात ,जी तुटकी झोपडी आमची.
पाला नी पाचोळा ची छत, हीच आमुची भिंत ,
नको माणसा बदलवू निसर्गाला ,गरज नाही रे त्याला.
तुलाच रे गरज त्याची , जगून घे जीवन तिच्या खुशीत..
.......✍️शिव.प्रकाश

Thursday, July 12, 2018

मराठी कविता...
.....................................
  मला का कळेना,हे भान कोणाचे..
मण हे वेरागी ,होणार कुणाचे ..
ना रात कळेना,ना दिस मिळेना ,
मी सोधु कुणाला ,मला का कळेना..
आठवणीत रुजूनी तुझ्यात मिळालो.
मी राहू कसा ग जगतानी जळालो..
✍🏻SK..

आयुष्य.....!

मराठी लेख.......भाग 1...दी१२/०७/१८

😊काही भाव असे पण आसतात ते न बोलून सांगता येते ना लिहून ..पण खरच कोणती तरी  वेळ अशी पण असते की न सांगता पण काही जण ओळखून घेतात ,त्या साठी ती व्यक्ती खूप मनापासून खास असली पाहिजे ... भविष्यात जे म्हणाल ती करण्याची धमक आपल्यात असते त्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही पण कमतरता असते ती आपल्यात आसेला भोलेपणा आणि दुसऱ्याकडून होते असलेला खलगर्गीपना  ...म्हणूनच तुम्ही काय आहात हे नका दाखवू ,पुडची व्यक्ती तुमच्या साठी
काय आहे हे लक्षात घेऊन त्या व्यक्ती साठी मनातून जेवढं होईल तेवढं करा ,आणि ती व्यक्ती पण तुमच्या साठी आणि तुम्ही पण त्या व्यक्ती साठी विशेष असणं गरजेचं हे....
"खरच समाजात कोण कोणासाठी काय आहे हे महत्वाचं नाही तर कोण कोणासाठी काय करतो हे महत्वाचं आहे"...वेळ बदलते काळ बदलतो पण माणूस तेव्हाच बदलतो जेव्हा सर्व्ह जण त्या व्यक्ती साठी बदलेले असतात...
                       #. विषय समाधानी असण्याचा ........
मला माझा मार्गदर्शन सरांनी विचारलं होत की तू तुझ्या जिवनात  समाधानी   आहेस का ?...
1 मिनिट विचार केला आणि सांगितलं की माणूस हा कधीच समाधानी नसतो ,जस जसे त्याच्या गरजा पूर्ण होतात तस तसे त्याची गरज वडायला लागते .आणि जी परिस्थिती आहे अथवा   जी काही गरज आपली पूर्ण झाली त्या गोष्टीत तो कधीच समाधानी नसतो...
कमीत कमी 22 व्या वयापर्यंत शिक्षण घ्यायचं आणि सेवठी 2 ते 3 वर्ष नोकरी साठी तारांबळ करून घ्यायची ,कमी पगारात आणि जास्तीच्या वेळ कामात स्वताला व्यथित करून टाकायचं हेच सद्याची जगण्याची पद्धत आपली ठरली ,जवळ पास 26 ते 27 वर्ष ह्यात घालायचं आणि जे काही पगार मिळतो त्या पगारात स्वतःला adjesment करायचं आणि कस बस मन मारून कोणाच्या तरी मनाला सावरून स्वतःच आयुष जगायचं...
आपल जे काही स्वप्नं आहे ते स्वप्न पूर्ण करायचं म्हणल तर मग जवळ पास 50 वी पार करावी लागेल...
हा जो सगळा खेळ आहे तो फक्त वेळेचा आहे,जो कोणी ह्या वेळे सोबत चालेले तोच आपल्या जीवनाचा अर्थ लावू शकतो.. आपले जे काही स्वप्न आहे ते आपण ह्या परिस्थितीत 30 वर्ष ह्यात तर पूर्न्ह नाही करू शकत .
स्वतःच घर , गाढी आणि स्वतःची बचत आपण कमी पगारात नाही पूर्ण करू शकत ..
आताची परिस्थिती खूप गंभीर आहे .आणि वेगळी , ह्या परिस्थितीत पाण्यासाठी सुधा पैसे मोजावे लागतात .....,
31 व्या वर्षानंतर लग्न गठित बधल्या जतोत आणि जे काही स्वप्न आपण लहान पणी बगितल त्या स्वप्नाला आपण आर्ध्यातच पूर्णविराम लावून मोकळे होतो ...मग 10 ते 15 वर्ष परिवार सांभाळण्यात जाते ,आणि राहील जे काही मूठ भर आयुष्य ते मुल सांभाळण्यात  आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यात जाते ,पण मला सांगा आपण केव्हा तरी समाधानी होतो का....!आपण आपलं  स्वप्न पूर्ण करू नाही शकत ,तर आपण स्वतःला कधीच समाधानी नाही म्हणू शकत.......


खूप मनात जीवनाबद्दल खंत आहे . स्वतःला घडवण्यासाठी आणि संकटाशी लढण्यासाठी आपण खूप मोठ्या गोष्टी आणि नाती गोती मागे सोडून गेलो...

 .............................  आठवणीतले मित्र , आठवणीतच ............................ प्रिय मित्रा तसेच भावा ,           तूझ्या मनात माझी जा...